गडचिरोली जिल्ह्यात आज(31 डिसेंबर) एका मृत्यूसह 19 नवीन कोरोना बाधित तर 19 कोरोनामुक्त

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.31डिसेंबर):-आज जिल्हयात 19 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 19 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9020 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8733 वर पोहचली. तसेच सद्या 185 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 102 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. एक नवीन मृत्यूमध्ये रा.आलापल्ली ता. अहेरी येथील 38 वर्षीय पुरुषाचा समावेश असून ती व्यक्ती एचटीएन आणि किडनी आजाराने ग्रस्त होती. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.82 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.05 टक्के तर मृत्यू दर 1.13 टक्के झाला.

नवीन 19 बाधितांमध्ये गडचिरोली 5, अहेरी 0, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 1, एटापल्ली 2, कोरची 0, कुरखेडा 9, मुलचेरा 0, सिरोंचा 2, व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 19 रूग्णांमध्ये गडचिरोली 8, अहेरी 4, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 2, धानोरा 0, एटापल्ली 0, मुलचेरा 1, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 0, व वडसा मधील 4 जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील आयटीआय चौक बजरंग नगर 2, सर्वोदय वार्ड 2 , कलेक्टर कॉलनी 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये 0, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये चिचोंडा 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये कसनसूर 2, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये शिवनी 1, बेलगांव 1, वाघेडा 1, धानोरी 1,साधुडोला 2, तलेगांव 2, पळसगांव 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये जाफराबाद 1, झिंगानूर 1, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 0, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0, जणाचा समावेश आहे.