शिक्षक भारताचा आधारस्तंभ

100

ज्ञान पेरतो मनात,नवा मनुज घडतो।
शब्द देऊन क्रांतीला,राष्ट्र पेटून उठतो।।

नवे ज्ञान स्वीकारून,जुने कुविचार फेकतो।
राष्ट्राचा सच्चा पाया , नव्या ज्ञानानं बांधतो।।

अज्ञान अंधःकारला ,ज्ञानानं दूर सारतो।
नव्या प्रयोगाची शाळा,मनामनात उभारतो।।

बाग फुलांची -मुलांची ,स्वः श्रमाने फुलवतो।
नव्या भारताचे भविष्य ,गावागावातून घडवितो।।

राष्ट्राचा खरा वाली,विद्यार्थी हित जपतो।
फुलणाऱ्या पंखाना,उडण्याचे बळ देतो।।

दौणाचार्याची समीक्षा करून,खरा गुरू सांगतो।
जोतीरावाच्या विचाराची , ध्वजा खांद्यावर घेतो ।।

ज्ञान रचनावादाचे ,नवे मूल्यमंथन करतो।
संविधान मूल्यजाणिवांचा,अविरत जागर करतो।।

मूलतत्ववाद्यांच्या भोदूगीरीचा ,बुरखा टराटरा फाडतो।
अमाणूष विषमतेचा ,पाया उखळून फेकतो।।

खरा ज्ञानवंत शिक्षक,भारताचा आधारस्तंभ बनतो।
जगाच्या समस्येवर ,नवे संशोधन करतो।।

नवकृतीच्या तंत्राने ,विज्ञानाची कास धरतो।
अवैज्ञानिक विचारावर,ज्ञानतेज प्रकाशतो।।

आपल्यातील गुणदोषाची ,जो तपासून करतो।
तोच शिक्षक,राष्ट्राचा उध्दार करतो।।

✒️संदीप गायकवाड,नागपूर
९६३७३५७४००