मोफत रक्तदान करून केली, नवीन वर्षाची सुरुवात

31

🔸लाईफ फाऊंडेशन, ब्रम्हपुरी मार्फत रुग्णाला तात्काळ मदत

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.1जानेवारी ):-राष्ट्रसंत तुकळोजी महाराज यांना आदर्श म्हाणणारे, ब्रम्हपुरी मधील लाईफ फाऊंडेशन बहुउद्देशीय संस्थेचे सक्रिय सदस्य, “मा.निशिकांत बावनकुडे” (रा. हनुमान नगर, ब्रम्हपुरी) यांनी आज दि.01/01/2021 रोजी ख्रिस्तानंद रुग्णालयात जाऊन एका लहानश्या 14 महिन्याच्या “काव्या यशवंत निकोडे (रा.आक्सापुर, ता.ब्रम्हपुरी) नामक मुलीला रक्तदान करून, नवीन वर्षाची सुरुवात एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने, सामाजिक बांधिलकी जोपासत केली आहे.

सदर रुग्णाला, जन्म: पासूनच रक्ताची नेहमीच गरज भासत असते, असे तिच्या वडिलांनी सांगले. या आधी पण त्यांना मागील जुलै महिण्यात आमच्या सामाजिक संस्थेमार्फत रक्ताची दोनदा मोफत मदत झाली होती, असे यशवंत निकोडे यांनी आज संस्थेचे अध्यक्ष उदयकुमार पगाडे यांना सांगितले.