✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.1जानेवारी):-महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र हे उद्योग संचालनालया अंतर्गत कार्यरत व महाराष्ट्र शासन पुरस्कृत स्वायत प्रशिक्षण संस्था असुन या संस्थेचा मुख्य उद्देश विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त नागरिकांना स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू करणेकरिता प्रेरित करणे व उद्योजकतेला पूरक असे वातावरण निर्मित करणे हा आहे.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र चंद्रपूर द्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक व युवतींकरीता दि. 12 जानेवारी ते 16 जानेवारी 2021 या कालावधीचे ऑनलाईन मशरुम लागवड व प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षणामध्ये मशरुमचे उत्पादन उद्योगास असलेला वाव, मशरुम उत्पादनांचे ब्राडिंग,अन्न व सुरक्षा आणि मानके, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, उद्योग उभारणीतील विविध टप्पे, बाजारपेठ पाहणी, विक्री कला व उद्योग व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे, कर्जविषयक योजनांची माहिती इत्यादी ऑनलाईन कर्जप्रकरण इत्यादी विषयांवर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक युवतीनी www.mced.co.in या वेबसाईटवर 11 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के व्ही. राठोड, दुरध्वनी क्रमांक 07172-274416, ९४०३०७८७७ व कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे, दुरध्वनी क्रमांक ९०११६६७७१७ किंवा ल्क्ष्मी खोब्रागडे मो. न. 9309574045 यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड यांनी कळविले आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED