सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे फुले दांपत्य सन्मान दिवस साजरा

31

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगांव(दि.2जानेवारी):- 1जानेवारी रोजी स्थानिय महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे फुले दांपत्य सन्मान दिवस साजरा करण्यात आला.सांस्कृतिक विभाग प्रमुख एम.बी. मोरे यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.आर. सोनवणे , जेष्ठ शिक्षीका सौ. एम.के. कापडणे यांच्या हस्ते १ जानेवारी १८४८ रोजी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा पुणे येथे भिडेच्या वाड्यात काढून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे भारतातील थोर समाज सुधारक – क्रांतीसुर्य – सत्यशोधक – राष्ट्रपिता – तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या कार्याला त्रिवार अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक जे.एस.पवार , एम.बी.मोरे , एस. व्ही. आढावे , एस.एन. कोळी , सी.एम.भोळे , हेमंत माळी , पी.डी. पाटील , व्ही.टी.माळी , श्रीमती व्ही.पी.वऱ्हाडे , श्रीमती.एम.जे.महाजन , लिपीक जे.एस. महाजन , पी.डी. बडगुजर , जीवन भोई , ग्रंथपाल गोपाल महाजन , अशोक पाटील, प्रदिप पवार उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.