केज शहरातील कविसंमेलनात दिग्गज कविंनी रंगवली मैफिल

38

🔸कवींनी कवीता सादर करत केले नवीन वर्षाचे स्वागत

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.2जानेवारी):-कुठल्याही गोष्टीची सुरुवात चांगली झाली की शेवट चांगला होतो असा समज आहे.सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी दिनांक १ जानेवारी रोजी साहित्य परिषदेच्या वतीने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.स्वामी विवेकानंद शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

साहित्य परिषदेचे जी.बी.गदळे यांच्या कल्पनेतुन या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मंचावर कवीता सादर करण्याचा मान मिळवणाऱ्या सीमा गुंड यांची उपस्थिती होती.यावेळी थंडगार वातावरणात काव्यमैफील रंगली.कवींनी विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या कवीता सादर केल्या.

यावेळी जी.बी.गदळे,कवी माणिकराव आनंदगावकर,राहुल गदळे,विक्रम डोईफोडे,अमिता पैठणकर,शारदा गुंड,जयश्री कोकीळ,दादा जमाले,गोपाळघरे सर,शरद शितोळे,नंदकुमार मस्के,चोले सर,जयपाल मस्के,मदने सर यांची उपस्थिती होती.यावेळी कवींनी विविध कवीता सादर करत कार्यक्रम रंगतदार केला.कार्यक्रमाचे संचलन अमिता पैठणकर यांनी तर आभार शारदा गुंड यांनी मानले.