✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.2जानेवारी):- गंगाखेड शहरातील मुख्य बाजारपेठ रस्त्यासाठी व पाईप लाईनसाठी गंगाखेड नगर परिषदेच्या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून काम मार्गी लागणार असल्याचे समजते.गंगाखेड शहरातील मुख्य बाजारपेठेतील असलेला खड्डेच खड्डे झालेला रस्ता व या कारणामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. आता कायमस्वरूपी सिमेंट रोडसाठी 3 कोटी 84 लाख राज्य शासनाने मंजूर केले असून नगरपरिषदेने केलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

या रस्त्याच्या कामा पूर्वी पाईपलाईन साठी 84 लाख असे एकूण 4 कोटी 68 लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते दिलकश चौकापर्यंत मुख्य रस्त्यावर सिमेंट रस्ता होणार असल्याचे परिपत्रक नगर विकास विभाग मुंबई येथील कक्ष अधिकारी महेंद्र दळवी यांच्या स्वाक्षरी काढले आहे.

गंगाखेड शहराला कायमस्वरूपी पक्का रस्ता मिळाला विजयकुमार तापडीया,नगराध्यक्ष, गंगाखेड नगरपरिषद
गंगाखेड शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यापार्‍यांसह वाहनधारकांना सतत होणारा त्रास आता थांबणार असून अडीच फूट खोदकाम करून मजबूत सिमेंट रस्ता होणार आहे. तांत्रिक बाबी पूर्ण करून दीड ते दोन महिन्यात प्रत्यक्षात टेंडर निघून काम चालू होईल व मार्च 2021 पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होईल. गंगाखेड नगरपरिषदेने केलेल्या सततच्या पाठपुराव्याची राज्य शासनाने दखल घेतली असून हा रस्ता होणार असल्याचे नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी सांगितले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED