🔸भागवत सप्ताहाचे वाचन ह. भ. प. भागवतकार हेमंत दासजी बावणे महाराज

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.2जानेवारी):- तालुक्यातील रणमोचन येथील गावकऱ्यांच्या वतीने नविन वर्षाच्या पर्वावर दि. 1 जानेवारी 2021 रोजी घटस्थापना करून भागवत सप्ताहाला सुरुवात करण्यात आली.

श्रीमद् ज्ञानदान हरिनाम भागवत सप्ताहाचे वाचन ह. भ. प. भागवतकार हेमंत दासजी बावणे महाराज पिंपळगाव ता. पवनी जि. भंडारा यांचे अमृततुल्य वाणीतुन होत असून दैनंदिन वेळेनुसार रोज सकाळी पाच ते सहा वाजता सामुदायिक ध्यान प्रार्थना सहा ते सात वाजता ग्रामसफाई व स्वच्छता मोहीम सात ते नऊ वाजता राम धुन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रतिमेचे पालखीसह मिरवणूक नऊ ते दहा वाजता ग्रामगीता प्रवचन सायंकाळी सहा ते साडेसात वाजता पर्यंत सामुदायिक प्रार्थना व हरिपाठ आठ ते साडेनऊ वाजता भजनाचा कार्यक्रम व नंतर दहा वाजेपासून प्रवचनाचा कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत राहणार आहे.

दि. 6 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता वैनगंगा नदी वर गोवर्धन पूजेचा विशेष कार्यक्रम संपन्न होणार असून दि. 07 जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता गोपाल काला व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

धार्मिक , महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED