✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.2जानेवारी):-भीम टायगर सेना शाखा पुसद यांच्या वतीने १ जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करून भीमा कोरेगाव येथील शूरवीरांना मानवंदना देण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.

तसेच समता सैनिक दलाच्या वतीने सल्यूट सलामी देण्यात आली .नंतर प्राध्यापक जनार्दन गजभिये , दीपक भवरे , भगवान बरडे यांनी विचार व्यक्त केले.

यावेळी प्रभाकर खंदारे, दत्ता कांबळे,अण्णा दोडके, संजय शेळके, राहुल झुंजारे ,भीमराव उंद्रे , गौतम खडसे,नारायण ठोके, विनोद जाधव, गिताबाई कांबळे,कमल पाईकराव ,माजी सैनिक भारत कांबळे, विकी खंदारे, दिपक गायकवाड, जनार्दन झाडगे, गजानन कांबळे ,सतीश खडसे व सर्व सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जनार्धन गजभिये यांनी केले. तसेच यावेळी भिम टायगर सेना पुसद तालुका अध्यक्ष या पदावर प्रभाकर खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन कार्यक्रमाला भीम टायगर सेनेचे पुसद तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED