हरसोडा येथे गौरवशाली इतिहासाच्या साक्षीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण

30

✒️मलकापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मलकापूर(दि.2जानेवारी):- नवंवर्षाच्या पहिल्या दिवशी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामात शौर्य गाजवलेल्या शूरवीरांच्या गौरवशाली इतिहासाला साक्ष ठेवत आज 1 जानेवारी 2021 रोजी हरसोडा ता.मलकापूर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण वंचित बहुजन आघाडीचे बुलडाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवचंद मोरे हे होते.

याप्रसंगी प्रथमतः तथागत बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर तथा महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले व पूज्य भन्ते संघपालजी यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले .तसेच भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अध्यम साहस दाखविणाऱ्या 500 शूरवीर योद्ध्यांना उपस्थितांनी मानवंदना दिली यावेळी जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांनी आपले मार्गदर्शन पर विचार व्यक्त केले.

पुतळा अनावरण प्रसंगी निवृत्ती तायडे,अशोकभाऊ जाधव सुभाष मोरे वासुदेव मोरे,हरी मोरे,ए.के.मोरे,राजू मोरे,देविदास मोरे,भीमराज मोरे,प्रकाश मोरे,सचिन तायडे,मुकेश निकम्, कैलास निकम्, विनोद कोगळे,देवाभाऊ मोरे,निलेशभाऊ झनके,अनंत मोरे,पांडुरंग झनके,वसंता निकम,किरण कोगळे,सूरज मोरे,संजय मोरे सर, सचिन इंगळे,निलेश मोरे,धम्मपाल तायडे,नीरज मोरे,अतुल इंगळे, सतीश मोरे,सागर तायडे,अश्विन धुंदाळे,जयपाल तायडे,आकाश निकम्,भिमाभाऊ इंगळे व उपासक उपासिका उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन राहुल मोरे यांनी केले तथा कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी भीमराज्य ग्रुप,बोधिसत्व ग्रुप,रमाई महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले