जालना येथील वृद्ध महिलेवर अमानुषपणे अत्याचाराच्या घटनेचा गंगाखेड मध्ये जाहीर निषेध

56

🔹अखिल भारतीय कैकडी समाज महासंघ यांचे गृहमंञ्याला निवेदन

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.2जानेवारी):-जालना येथील एका वृद्ध महिलेवर एका युवकाने 28 डिसेंबर रोजी मध्यरात्री अत्याचार केल्याची घटना घडली या अमानुष घटनेला पाच दिवस उलटून देखील त्या आरोपीविरोधात अद्यापही गुन्हा दाखल नाही. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. अत्याचार करून गुन्हेगार सर्रासपणे आरोपी फिरत आहे.

या नराधमांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला नवीन शक्ती कायद्याअंतर्गत 21 दिवसात शिक्षा देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय कैकाडी समाज महासंघ व वडार समाजाच्या वतीने दिनांक 2 जानेवारी 2021 रोजी तहसीलदार मार्फत राज्याचे गृहमंत्री यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर लक्ष्मणराव गायकवाड, नगरसेवक नागनाथ कासले, ओबिसी फाऊंडेशन अध्यक्ष लक्ष्मण लटपटे ,जिल्हा अध्यक्ष वडर संघटना माधवराव इंगळे, अशोकराव जाधव, रोहिदास लांडगे ,टायगर सचिन जाधव, प्रभाकर घुगरे, अविनाश जगतकर, रोहिदास गायकवाड, मंगल गायकवाड ,देविदास गायकवाड, लक्ष्मण जाधव ,अजय गायकवाड यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.