सावित्री उत्सव २०२१

34

✒️लेखिका:-पूर्वा निलिमा सुभाष,अभिनेत्री.

माझं नाव पूर्वा निलिमा सुभाष आहे.व्यवसायाने मी अभिनेत्री आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन या शाखेतून मी इंजिनियरिंग केले आहे.माझं शिक्षण आधी सांगण्याचा उद्देश हा की,आपण आज बोलत आहोत ते ३ जानेवारीच्या निमित्ताने म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस आहे त्या निमित्ताने.३ जानेवारी हा आपण गेल्या अनेक वर्षापासून सावित्री उत्सव म्हणून साजरा करतो म्हणजे वर्षातला पहिला सण साजरा करावा तसा.

महात्मा जोतिबा फुले,सावित्रीबाई,फातिमा शेख यांनी जे कार्य करून ठेवले आहे.ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि खरतर आज आपण,विशेषतः स्त्रिया शिक्षण घेवू शकलो समाजा मध्ये वावरू शकलो या साऱ्यांच श्रेय सावित्री बाई फुले यांनाच जाते.कारण या साऱ्यांची सुरुवात त्यांनीच केली आहे.आज मी इंजिनियर झाले, सॉ्फ्टवेअर कंपनीत काही वर्ष काम केले नंतर ती नोकरी सोडून अभिनयाच्या क्षेत्रात काम करण्याचा मी निर्णय घेवू शकले तो निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मला होतं या साऱ्यांचे श्रेय आजही सावित्रीबाई फुले यांनाच आहे.

मी जरी एवढं शिक्षण घेवू शकले हा माझा प्रिव्हीलेज आहे.अनेक गोष्टींमुळे मला मिळालेला तरीही आपल्या अनेक बहिणी प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी झगडत असतात.सांगण्याचा उद्देश एवढाच की प्रत्येक स्त्रीचा आपापल्या पातळीवर हा लढा सुरू असतो.प्रत्येक जण आपापल्या जागी राहून ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करीत असतो.समतेच्या, बंधुतेच्या,ज्ञानाच्या या कक्षा रुंदावत राहण्याचा प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे असे मला वाटते आणि अशी ही सावित्री आज ही घरोघरी लढा देत आहे.आपण म्हणतो असं की,सावित्री आहे घरोघरी जोतिबाचा मात्र शोध जारी हे बहुतांशी खरं आहे.

मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात असे अनेक अनुभव आलेले आहेत ज्यात मी म्हणू शकते की जोतिबा सुद्धा घरोघरीं आहेत आणि ते आपापल्या परीने आपापल्या सावित्रीला साथ देण्याचा प्रयत्न करीत आहेत आज ही…
माझा बाबा सुभाष लोमटे आणि आई निलिमा यांचं उदाहरण मी लहान पणापासून पहात आले आहे.त्या दोघांमध्ये जे नाते आहे.एकमेकांना साथ देण्याचे,एकमेकांचे जोडीदार असण्याचे जे नाते आहे,जे लहानपणापासून मी पहात आले आहे.ज्यामुळे कदाचित मला लहानपणापासून स्वतःला सुद्धा माझा निर्णय स्वतः घेण्याचा माझी मते ठामपणे इतरांसमोर मांडण्याची,मला हव्या त्या क्षेत्रात शिक्षण घेण्याची,मला हव्या त्या क्षेत्रात करिअर करण्याची जी संधी,जे स्वातंत्र्य मला मिळाले त्या मागे माझ्या आई बाबांचा हात आहे.माझ्या आयुष्यात आलेले ते माझे जोतिबा आहेत.

गेल्या वर्षी माझं लग्न झालं.माझा नवरा आणि मी आधी आम्ही मित्र आहोत.आमच्या दोघां मधल्या मैत्रीचे नाते अधिक दृढ आहे.सावित्री आणि जोतिबा यांनी एकमेकांचे जोडीदार म्हणून त्यांनी जो आदर्श घालून दिला आहे. आख्या जगा समोर.आता पासून काही वर्ष अगोदर काळाच्या किती पुढचा जोतिबा विचार करीत असतील.मला तर असे वाटते की,आपण २१ व्या शतकात जगत असताना आजची सावित्री तर लढा देतेच आहे.पण अनेक जोतिबांनी पुढे येण्याची गरज आहे.कित्येक पातळीवर ऑलरेडी ते घडतंच आहे.पण अजुन अजुन या पुढे सुद्धा अनेक जोतिबा आपापल्या सावित्रीला साथ देण्यासाठी पुढे येत राहोत अशी मी आशा करते.

३ जानेवारीच्या निमित्ताने सावित्रीबाईंच्या स्मृतीस मी वंदन करते.आणि या दिवशी त्यांच्यापरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावित्री उत्सव म्हणून साजरा करावा असे आवाहनही तुम्हाला करते.

 

( पूर्वा निलिमा सुभाष या अभिनेत्री असून “जय मल्हार” या मालिकेत आणि “इंदिरा” या नाटकात काम केलेले आहे.आणि साथी सुभाष लोमटे शेतकरी, शेतमजूर असंघटित कामगारांसाठी लढणारे पुरोगामी चळवळीत प्रसिद्ध नेते आहेत )