✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.3जानेवारी):- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम महाराणाप्रताप नगर योग वर्गात
मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रयाचे अध्यक्ष पुसद तालुका पतंजली योग समितीचे प्रभारी, प्रकाशजी वानरे हे उपस्थित होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून पंडीत गादेवार मामा, भैया पद्मावार, विवेकजी ,सुभाष जी व्यवहारे, प्रा. बोबडेसर, मंदाडेसाहेब, जितेंद्र किन्हिकर मिडिया प्रभारी राम पद्मावार तर महिलामधुन, माधुरी ताई वानरे, रंजनाताई किन्हिकर. संवाद प्रभारी वर्षाताई हरणे, गार्गी वानरे इ. उपस्थित होते.

तसेच यावेळी पुजा गडदे ने सावित्रीबाई फुलेच्या जीवनातील अनेक खडतर प्रसंग विषद करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षासह सर्व पाहुणे मंडळीचे पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याच दिवशी योगसाधिका अर्चना खडसे यांचा वाढदिवस असल्याने ल.पुं. कांबळे परिवारातर्फे शाल पुष्पहार घालून व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.

सर्वांना खडसे परिवारातर्फे अल्पोपहार देऊन कार्यक्रम उठावदार करण्यात आला.आभार प्रदर्शन दिपाली काळे तर संचालन योग शिक्षक ल.पुं. कांबळे यांनी केले. याकार्यक्रमाची यशस्वीतेसाठी निर्मलाताई कुमकर, दिशा राठोड, तानाजी काळे, दिलीप सोनोने. सर्व बालसाधकांनी घेतली होती.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED