✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

शेगाव(दि.3जानेवारी):- मुलीसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणार्‍या क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांची जंयती रविवारी शेगांव शहरात उत्साहाने साजरी करण्यात आली या निमिताने शेगांव शहरातील सावता चौकामध्ये साविञीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. नगरसेवक श्री. शैलेषभाऊ डाबेराव ,आशीष गणगणे यांनी साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी नगर सेवक शैलेषभाऊ डाबेराव यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आघ शिक्षिका स्री शिक्षणाच्या प्रणेत्या ,क्रांतीज्योती साविञीबाई फुले चे कार्य प्रेरणादायी व क्रांतीक्रारी आहे साविञीमाईने प्रगतशिल व शिक्षित समाज घडविण्याचे कार्य पुढे नेणे हिच खरी काळाची गरज आहे.

म. ज्योतीबा फुले व साविञीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखुन समाज शिक्षित करण्याकरिता केलेल्या महान कार्याचे महत्व विषद केले सदर कार्यक्रमाला माजी नगर सेवक श्री. दिनेश भाऊ लहाने , शिक्षक संजय दिंडोकार, निलेश दिंडोकार ,व परिसरातील नागरिक उपस्थीत होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED