लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त लोकनेते चषक भव्य टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांच्या हस्ते वितरण

25

🔹ग्रामीण भागातील क्रिडापटुंना वाव देणारा प्लॅटफॉर्म म्हणजे स्पर्धा – निळकंठ चाटे

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी वैजनाथ(दि.3जानेवारी):- ग्रामीण भागात विविध प्रकारच्या क्रिडागुणांना वाव मिळाला पाहिजे.यासाठी विविध स्पर्धा होणे आवश्यक असते. ग्रामीण भागातील क्रिडापटुंना वाव देणारा प्लॅटफॉर्म म्हणजे या स्पर्धा ठरल्याचे गौरवोद्गार भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी केले.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त परळी मतदारसंघातील युवकांसाठी टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सुरेश फड व सर्व मित्र मंडळच्या वतीने करण्यात आले होते. याचे बक्षीस वितरण भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळंकट चाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

शहरातील तहसील समोर मैदानावर लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त लोकनेते चषक वर्षे दुसरे भव्य टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेची सुरुवात १२ डिसेंबर ला करण्यात आली होती. या क्रिकेट स्पर्धेतील सामने एकुण 23 दिवस चालले. क्रिकेट स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरण मध्ये स्पर्धा पारपडल्या या स्पर्धेचे दि. 02 जानेवारी रोजी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळंकठ चाटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पधेत 105 संघाने संहभाड घेतला होता. फायनल लढत हिदू संघाने 64 धावांचे लक्ष दिले होते. ते नायक वसंतनगर संघाने सहा षटकामध्ये पार केले व विजय मिळविला.

प्रथम पारितोषिक 21 हजार 571 रूपयांचे पारतोषीक ग्रामीण भागातील नायक वसंतनगर टीमने पटकावले तर दुसरे पारितोषिक 11 हजार 571 रूपयांचे हिंद 11 परळी या टिमने पटकावले तर वैद्यनाथ दुर्गोत्सव टीमने तिसरे 5 हजार 571 रूपयांचे पारितोषिकांचे बक्षीस पटकावले आहे. यावेळी नगरसेवक पवन मुंडे, सतिश फड, योगेश पांडकर, बाळासाहेब फड, शाम गित्ते, विशाल मुंडे, अमर कराड, दत्ता मुंडे, तानाजी बदने, शंकर, वैजनाथ आंधळे, ज्ञानेश्वर फड, ज्ञानेश्वर मुंडे, पप्पू मुंडे व इतर उपस्थित होते.