कै.भुरेसिंग सत्तरसिंग गिरासे यांचे स्मरणार्थ फळ वाटप

59

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.3जानेवारी):-विखरण येथील कै.भुरेसिंग सत्तरसिंग गिरासे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येतात. मागच्या वर्षी प्रथम पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबीर आयोजीत केले होते.

या वर्षी द्वितीय पुण्यस्मरणार्थ चंद्रशेखर आझाद चौक मित्र मंडळ यांच्याकडुन त्यांच्या प्रतिमेच पूजन करून श्रंधाजली वाहिली आणि प्राथमिक आरोग्य केंद्र विखरण देवाचे येथे रुग्णाना फळवाटप करण्यात आले व त्यांना आवश्यक असणार्या गोष्टीचा पुरवठा करून दिला.

वर्षेभर आझाद चौक मित्र मंडळी सामाजिक व आर्थिक मदत हे समाजात करत असतात. आज या ग्रुप निमित्त समाजात रग्णसेवा हिच इश्वर सेवा यांचे दर्शन घडुन आले.