🔸वसंत मुंडे यांनी दिली माहिती

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.3जानेवारी):-महाराष्ट्रात बीड जिल्ह्याचा जलयुक्त शिवार घोटाळा गाजला त्यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघात गेली चार वर्षापासून सतत पाठपुरावा करणारे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी अखेर उपलोकायुक्त दि, 14/ 10 /2020 च्या कॉन्फरन्स सुनावणी द्वारे गुत्तेदार ची काळी यादी जाहीर करा अशी विनंती सुनावणीदरम्यान वसंत मुंडे यांनी केली होती.

त्यात पूर्वीचे 138 व सध्याचे 29 गुत्तेदार मजूर सहकारी संस्था व सुशिक्षित बेकार अभियंता असे एकूण बीड जिल्हा अंतर्गत जलयुक्त शिवाराच्या बोगस बिल घोटाळा प्रकरणात 167 गुत्तेदार सह काळी यादीत जाहीर सरकारने केली 32 अधिकारी निलंबन या जलयुक्त शिवार बोगस बिल घोटाळा प्रकरणात कारवाई झालेले आहे. उपलोकायुक्त यांनी प्रधान सचिव , कृषी आयुक्त आयुक्त पुणे यांना तात्काळ मजूर सहकारी संस्था सुशिक्षित बेकार अभियंता व गुत्तेदार यांना काळा यादीत टाकण्याचे आदेश दिले.

त्यानुसार कृषी अधीक्षक बीड व जिल्हाधिकारी अध्यक्ष जलयुक्त शिवार समिती बीड यांनी दि, 28/ 12/ 2020 जा.क्र./जयुशि/जिअकृअ/काळी यादी/- कवि 2020 /4981 जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय बीड काळी यादी गुत्तेदार यांची जाहीर केली आहे . त्यांच्याकडील वसुली संदर्भातही आदेश दिले असून अद्यापही गुत्तेदार वर मजूर सहकारी संस्था व सुशिक्षित बेकार अभियंता यांच्यावर गुन्हा नोंद झाला नाही. उपलोकायुक्त यांच्या सुनावणी च्या वेळेस काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

8 कोटी 36 लाख वसुलीचे गुतेदार व अधिकारी यांनी 50 टक्के 50 टक्के पैसे भरण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .परंतु कृषी विभागामार्फत व पोलीस विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर राजकीय दबावतंत्राचा वापर असल्यामुळे संपूर्ण कारवाईस विलंब वसुली व गुन्हे नोंद करण्यासंदर्भात लावला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला आहे. तरी येणाऱ्या जानेवारीच्या सुनावणीमध्ये मध्ये उप लोकायुक्त यांच्याकडे मुद्दे निहाय तक्रार करणार असे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी पत्रकारांना सांगितले.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED