दिग्रस येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा

36

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.3जानेवारी):-दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुकाशाखा दिग्रस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंडळ दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने मानवंदना कार्यक्रम संपन्न.

दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुकाशाखा दिग्रस व डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंडळ दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने मानवंदना कार्यक्रम घेण्यात आला.सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माजी शिक्षणाधिकारी वाल्मिक इंगोले व तालूका अध्यक्ष विनायक देवतळे यांनी पुष्पहार अर्पण करून मेनबत्ती प्रज्वलीत केली.समता सैनिक दलाचे अध्यक्ष धर्मदास गायकवाड यांनी सावधान विश्रामची अॉर्डर देऊन भिमाकोरेगाव येथील विजयस्तंबाला मानवंदना देण्यात आली.

पंचशिल त्रिशरण, भिमस्मरण व भिमस्तूती घेण्यात आली.मुकनायक न्यूज चॅनल संपादक धर्मदास गायकवाड यांनी मुकनायक कॅलेंडर सर्वांना वितरीत केले.कार्यक्रम व्यवस्थेसाठी यशवंत भरणे,रमेश वहीले यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचलन एकनाथ मोगले व आभार प्रदर्शन तालुका शाखा अध्यक्ष विनायक देवतळे यांनी केले.कार्यक्रमाला बहूसंख्य बौध्द उपासक व उपासिका आणि शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.सरणतय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.