🔺तीन आरोपींना १७ महिने कारावस व १ हजार रू.दंड

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.3जानेवारी):-येथून ७ किमी अंतरावरील संगम येथील मंदिराच्या पुजा-याच्या पुजा-याच्या घरी चोरी केल्याप्रकरणातील तीन आरोपींना २ जानेवारी रोजी धर्माबाद न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.बी.सांळुके यांनी प्रत्येक आरोपीला १७ महिने कारावस व १ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

संगम येथील मंदिरात पुजारी असलेले पुंडलिक गंगाराम करे यांच्या घरी दि.७ जुलै २०१९ रोजी चोरट्यांनी २० हजार रू.नगदी व ५ ग्रँम सोन्याची अंगठी लंपास केली होती. याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात कलम ४५४,३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विनोद कांबळे,पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे तसेच पोलीस कर्मचारी महेश माकुरवार,नजीर शेख यांनी याप्रकरणाचा तपास बारकाईने करीत एका महिन्यात या प्रकरणातील आरोपी पंडुगा रमेश राजन्ना (रा.दंडीगुडा जि.निझामाबाद),पुढारी नागेश बाजेन्ना(रा.राधुपल्ली,जि.निजामाबाद) व करणे लिंगम राजेन्ना (रा.कराडपल्ली जि.कामारेड्डी) यांना ऐवजासह जेरबंद करुन या प्रकरणाचा छडा लावला.

तसेच या प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.त्या प्रकरणाचा निकाल दि.२ जानेवारी रोजी धर्माबाद येथील प्रथमवर्ग न्यायालयाने दिला यात उपरोक्त तीनही आरोपींना दोषी ठरवित प्रत्येकी १७ महिने कारावास व एक हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

क्राईम खबर , महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED