गंगाखेडात साकारली माणूसकीची भिंत

96

🔹सावित्रीबाई फुले जयंती दिनी शुभारंभ

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.3जानेवारी):-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी गंगाखेड येथे ‘माणूसकीची भिंत’ ऊपक्रम सुरू करण्यात आला. भोलारामजी कांकरीया सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजीक कार्यकर्त्या मंजु दर्डा यांनी हा ऊपक्रम सुरू केला. ऊपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते आणि कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत गरजूंना साहित्य वाटप करून या भिंतीचे आज ऊद्धाटन करण्यात आले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज सर्वत्र ऊत्साहात साजरी करण्यात आली. गंगाखेड शहरातही या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्व. भोलारामजी कांकरीया चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा मंजू दर्डा – जैन यांनी एक आगळा ऊपक्रम नव्याने सुरू करत सावित्रीबाई फुले यांना आदरांजली अर्पण केली. प्रामुख्याने जुन्या कपड्यांसह संसारपयोगी साहित्यही गरजूंसाठी ऊपलब्ध करून दिले जाणार आहे. गरजवंतांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

ऊपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी या उपक्रमास शुभेच्छा देत स्वतः कपडे भेट दिले. तसेच आवश्यक ते सहकार्य करण्याची हमी दिली. गोविंद यादव यांनी मंजू दर्डा यांच्या कार्याचा गौरव करत अशा सामाजीक कार्यकर्त्या सावित्रीच्या खऱ्या लेकी आहेत, अशा शब्दात ऊपक्रमाचे कौतूक केले. तर मंजू दर्डा यांनी कांकरिया सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून भविष्यात असे अनेक ऊपक्रम राबवण्याचा मनोदय व्यक्त केला.

याप्रसंगी मातोश्री श्रीमती चंचलबाई कांकरिया, ॲड. नंदकुमार काकाणी, संजयलाला अनावडे, सौ. रेणू व श्री प्रकाश घण, पत्रकार प्रमोद साळवे, रमेश कातकडे, ऊत्तम आवंके, प्रा. पिराजी कांबळे, करंडे सर, सदाशीव महाराज, आनंद सारडा आदिंची प्रमुख ऊपस्थिती होती. सुजाता पेकम, चंदनबाला धोका, रमेशचंद धोका, शंकेश धोका, यश गेलड़ा आदिंनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले. प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन पुजा दर्डा यांनी केले.