सावित्रीच्या लेकींनी महारॅलीतून दिली सावित्रीमाईंना मानवंदना

32

🔹धरणगाव शहरात सलग तिसऱ्या वर्षी रॅलीचे आयोजन

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगांव(दि.३जानेवारी):- रविवार रोजी विद्येची खरी देवता – ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महारॅलीचे व वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने या वर्षापासून सावित्रीमाई फुले यांचा जयंती उत्सव ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करायला सांगितले आहे. धरणगाव शहरात मागील 3 वर्षांपासून माईंच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने रॅलीचे आयोजन केले जाते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सावित्रीमाईंच्या कार्याची महती वर्णन करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की , आज धरणगांव शहरात झालेल्या महारॅलीने सर्वाचे लक्ष वेधुन घेतले. कार्यक्रमाची सुरुवात धरणी चौक येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या स्मारकाला तसेच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. यावेळी माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, उपनगराध्यक्षा कल्पना महाजन, माजी उपनगराध्यक्ष सुरेखाताई महाजन, नगरसेविका संगिता मराठे यांच्यासह प्राध्यापिका व शिक्षिका भगिनी, विद्यार्थिनी व गावातील महिला भगिनी तसेच गावातील अनेक प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते.

रॅलीच्या सुरुवातीला महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या वेशभुषा केलेल्या वैशाली माळी व दिपाली नेतकर या मुली होत्या. त्यांच्यासोबत राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्यामाई होळकर, माता रमाई, फातिमा बी शेख तसेच डॉक्टर – वकील – पोलीस यांच्या वेशभूषा साकारलेल्या सवित्रीमाईंच्या लेकींनी साकारल्या होत्या. सवित्रीमाईंच्या प्रतिमेच्या ट्रॅक्टर च्या पुढे सवित्रीमाई शिकवत असतांना व व विद्यार्थिनी शिकत असतांनाच्या जिवंत देखाव्याचे ट्रॅक्टर होते. धरणगाव शहरातील सर्व शाळांच्या सर्व विद्यार्थिनींनी सावित्रीमाईंच्या वेशभूषा साकारल्या होत्या. त्यांच्या सोबत शिक्षक बंधु – भगिनी, गावातील विविध समाज बंधू – भगिनी सहभागी झाले होते.

धरणी चौकातून सुरू झालेली रॅली कोटबाजार – लालबहादुर शास्त्री स्मारक – लांडगे गल्ली – परिहार चौक – छत्रपती शिवराय स्मारक – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते महात्मा फुले हायस्कूल असा मार्गक्रमण करत समारोपस्थळी आली. या रॅलीत महात्मा फुले हायस्कूल , पी. आर. हायस्कूल, अँग्लो ऊर्दू हायस्कूल, इंदिरा कन्या विद्यालय, बालकवी ठोंबरे विद्यालय या सर्व शाळांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचा समारोप सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर. सोनवणे मॅम होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून जि. प. उच्च प्राथमिक शाळा पाळधी बॉईजच्या शिक्षिका मनिषा शिरसाठ मॅम होत्या. निकिता महाजन हिने तात्यासाहेब व माईंचा गौरव करणारे गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीमाईंच्या प्रतिमेला करण्यात आले. रुपाली पाटील हीने सावित्रीमाई डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याचा विषय आहे, असे प्रतिपादन केले. महात्मा फुले हायस्कूलच्या एम. के. कापडणे व वैशाली वऱ्हाडे यांनी आपल्या मनोगतातून माईंचे कार्य सांगितले. प्रमुख वक्त्या मनिषा शिरसाठ मॅम यांनी आपल्या मनोगतातुन सावित्रीमाईंच्या कार्याच्या विविध पैलुंवर प्रकाश टाकला.

पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, आद्य कवयित्री, कुशल प्रशासक, साहित्यिक, विचारवंत अशा विविध भूमिका सावित्रीमाईंनी समर्थपणे निभावल्या. स्व-कृतीतून समाज सुधारणा करणाऱ्या सावित्रीमाई या खऱ्या अर्थाने कर्मयोगिनी होत्या, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलच्या पी. आर. सोनवणे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातुन या देखण्या कार्यक्रमाच्या नियोजनाची स्तुती केली. उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर कार्य करा व आपल्या कृतीतून माईंचा जन्मदिवस सातत्याने साजरा करा, असेही म्हणाल्या.

कार्यक्रम प्रसंगी धरणगांव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, माजी उपनगराध्यक्ष सुरेखा महाजन, माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष विठोबाभाऊ महाजन, उपाध्यक्ष योगराजदादा माळी, सचिव दशरथ बापु माळी, लहान माळीवाडा अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, कोषाध्यक्ष व्ही. टी. माळी, नगरसेवक विलास माळी, सुरेश महाजन, भागवत चौधरी, ललीत येवले, सुकदेव महाजन, माजी मुख्याध्यापक एस. डब्ल्यू .पाटील, डॉ.आर.टी. सोनवणे, माजी नगरसेवक मधुकर रोकडे, गुलाब मराठे, सुनिल चौधरी, विकास लांबोळे, दिपक वाघमारे, ललीत पाटील, वैभव पाटील, बालु जाधव, अभिजीत पाटील, मुकेश बयस, महेंद्र तायडे, कैलास पवार, विजय सोनवणे, विकास पवार, रवि महाजन, प्रदिप माळी, गणेश महाजन, गौरव चव्हाण , रामचंद्र माळी, अँग्लो उर्दूच्या शिक्षिका वहीदाबी अब्दुल अहद शेख, खान आसमा अय्युब, नदीम खान बाबू खान, सय्यद अब्दुल बारी वसिफ अली, परवेज सलिम खाटीक यांच्यासह बालकवी विद्यालयाचे आर. डी. महाजन, पी. आर. हायस्कूलचे के.आर.वाघ, इंदिरा कन्या विद्यालयाचे सुनिल देशमुख, महात्मा फुले हायस्कूलचे व्ही. पी. महाले, जे. एस. पवार, एम. बी. मोरे, एस. व्ही. आढावे, एस.एन. कोळी, सी.एम.भोळे यांच्यासह शाळेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते. रॅलीच्या मार्गदरम्यान पुष्पवृष्टी, पुष्पहार व पाण्याचे जार यांची व्यवस्था चंदन पाटील व गोपाल पाटील यांनी केली. मुन्नादेवी अँड मंगलादेवी मल्टिपर्पज फाउंडेशन संचलित “कै. सौ. ज्योतीदेवी अन्नपूर्णा भांडार” यांच्या वतीने कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अल्पोपहार देण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा फुले हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक पी.डी.पाटील, हेमंत माळी, एव्हीबी माझाचे तालुका प्रतिनिधी आबासाहेब राजेंद्र वाघ, माझा महाराष्ट्र न्यूजचे निलेश पवार, विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील, राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख , महात्मा फुले ब्रिगेडचे नरेंद्र (राजू) महाजन, सावता माळी युवक संघाचे निलेश माळी, विनायक महाजन, योगेश माळी, बहुजन क्रांती मोर्चा, राजे प्रतिष्ठान या सामाजिक संघटनांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन रुपाली पाटील हिने केले.