✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114/9404223100

गेवराई(दि.4जानेवारी):-तालुक्यातील राक्षसभुवन नजीक असलेल्या गंगावाडी येथे रुस्तुम बाबाजी मते या 65 वर्षीय शेतकऱ्याला चिरडून वाळूचा टिप्पर पसार झाला आहे.पहाटे साडेसहा वाजता ही दुर्घटना घडली, या शेतकऱ्याचे अक्षरशः तीन तुकडे झाले असून कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेत ग्रामस्थांनी आंदोलन सूरु केले आहे.राक्षसभुवन येथून नदीपात्रातील वाळूचा बेसुमार उपसा सूरु आहे.

रात्रीतून शेकडो, हजारो ब्रास वाळू येथून अवैध पध्दतीने उपसली जाते.सोमवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास शेताकडे निघालेले शेतकरी रुस्तुम बाबाजी मते वय 65 यांना वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा,टिप्परने अक्षरशः चिरडले.यामध्ये शेतकरी जागीच ठार झाला असून ही घटना कळताच ग्रामस्थांनी वाळू वाहतूक बंद करून कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले आहे.

Breaking News, महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED