✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

चंद्रपूर(दि.4जानेवारी):- रंजन सामाजिक मंच चंद्रपूर संस्थेची सभा पार पडली,सभेमध्ये कार्यकारिणीची निवड तसेच संस्थेच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला व सविस्तर चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ नंदकिशोर मैंदळकर यांची तर सचिन बरबटकर यांची सचिवपदी निवड करण्यात आली,उपाध्यक्ष नितीन चांदेकर,कोशाध्यक्ष डॉ राहुल विधाते,सहसचिव गंगाधर गुरनुले कायदेशीर सल्लागार ऍड धीरज ठवसे,गौरव अक्केवार, किशोर जांपालवर,राजू कांबळे,पिंटू मून,तुषार आक्केवार यांची एक मताने निवड करण्यात आली.

अध्यक्षपदासाठी ऍड धीरज ठवसे,तर सचिवपदासाठी नितीन चांदेकर यांनी अनुमोदन दिले संस्थेचा कार्यवृत्तांत वाचून दाखविण्यात आला व कार्याचा आढावा घेण्यात येऊन पुढील सामाजिक कार्यात वाढ करण्याबाबत विस्तृत चर्चा सत्र घेण्यात आले.

समाजाभिमुख,मार्गदर्शनपर,जनजागृती,प्रबोधनपर कार्यक्रम घेऊन समाजागृतीचे कार्य करणे,होतकरू बेरोजगार ग्रामीण युवकाना मार्गदर्शन व प्रत्यक्षिक करणे हाच रंजन संस्थेचा एकमेव उद्देश आहे असे यावेळी सांगण्यात आल.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED