✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलढाणा(दि.4जानेवारी):-प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रपत्र ब मधील यादीनुसार सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी बुलडाणा तालुक्याला एकूण 464 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या यादीनुसार आज रोजी लाभ द्यावयाचे एकूण 464 घरकुल लाभार्थी शिल्लक होते. शिल्लक लाभार्थ्यांचे एकूण 464 म्हणजे 100 टक्के उद्दिष्ट बुलडाणा तालुक्याला प्राप्त झाले आहे.तरी 464 घरकुलांचे उद्दिष्ट पंचायत समितीला प्राप्त असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रपत्र ब यादीनुसार लाभार्थ्यांनी स्वत: ची जागा उपलब्ध करून संबंधीत गावचे ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक यांचेशी संपर्क साधावा.

प्रस्तावासोबत लागणारे आधार कार्ड, बँक पासबुक प्रत, मग्रारोहयोचे जॉब कार्ड, राहत्या घराचा फोटो, राशन कार्ड, राहत्या जागेचा नमुना 8 आदी कागदपत्रे ग्रामपंचायतीमध्ये तात्काळ सादर करावी. संबंधीत ग्रामसेवक यांनी परिपूर्ण घरकुलांचे प्रस्ताव पंचायत समिती, बुलडाणा या कार्यालयात सादर करावे. ज्या लाभार्थ्यांकडे जागा उपलब्ध नाही. अशा लाभार्थ्यांना पंडीत दिनदयाल उपाध्याय योजनेतंर्गत जागा खरेदी करण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत पंचायत समिती येथे प्रस्ताव सादर करावे. घरकुल मंजूरी करीता कोणत्याही व्यक्तीस अथवा कर्मचाऱ्यासोबत आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन गटविकास अधिकारी, पंचायत समिती, बुलडाणा यांनी केले आहे.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED