✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.5जानेवारी):-दुष्काळीमाण तालुक्याचे फलटण बारामतीप्रमाणे औद्योगिक वसाहतीचे अनेक वर्षाचे स्वप्न लवकरच साकार होणार असून मुबई आणि बंगळुरू क्षेत्रातर्गत माण तालुक्यातील म्हसवड आणि धुळदेव येथे आठ हजार एकरात हा प्रकल्प उभा राहणार असून याचा आराखडा तयार करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून निधीसाठी केंद्र सरकारकडे ओरस्ताव पाठविल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे समुख्य अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.

माण तालुक्यामध्ये औद्योगिक वसाहत विकसित करण्यासाठी केंद्र सरकार निधी देणार असून त्यामध्ये रस्ते ,वीज,पाणी आणि व्यवसायासाठी उद्योजकीय जागा म्हसवड शहर असल्यामुळे निवासासाठी काही जागा असे काही विविध प्रकारचे आराखडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने असा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED