मोहबोडी येथे सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव उत्साहात साजरा

26

✒️सिंदेवाही(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सिंदेवाही(दि.5जानेवारी):- माळी समाज तथा क्रांतीज्योती युवा फाउंडेशन मोहबोडी द्वारा आयोजित 3 जानेवारी २०२१ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीरामजी मोहुर्ले तर प्रमुख वक्ते म्हणून राजश्री वसाके मॅडम तर प्रमुख अतिथी म्हणून मधुकरजी गुरनुले, गुलाब मेश्राम, योगराज आत्राम, गुरुदास आत्राम, विठ्ठल आवळे, किरण मोहुर्ले, देवानंद मोहुर्ले, संजय मोहुर्ले, विजय मोहुर्ले, वनिता ठाकरे, लिलाबाई मोहुर्ले, प्रभा मोहुर्ले, हेमलता आत्राम यांची मंचावर उपस्थित होते.

सर्वप्रथम शाळेतून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शोभायात्रेची सुरुवात करून गावातून मिरवणूक काढून कार्यक्रम स्थळी पोहोचवण्यात आली. कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष आणि सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाज चे अध्यक्ष मधुकरजी गुरनुले यांनी केले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या राजश्री वसाके मॅडम यांनी सावित्रीबाईची थोरवी आपल्या विचारातून मांडत त्यांचे विचार सर्वांनी अंगीकारत पुढे न्यावे असे आव्हान केले.

या कार्यक्रमामध्ये क्रांतीज्योती युवा फाउंडेशन यांच्या तर्फे दरवर्षी प्रमाणे गाव पातळीवर सामाजिक कार्य करणाऱ्या निवडक व्यक्तींचा समाज गौरव पुरस्काराने व गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळपासूनच मोठ्या उत्साहाने झाली. यामध्ये सकाळी ८.०० वाजता ग्रामस्वच्छता अभियान, सकाळी ९.०० वा. महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, सकाळी १०.०० वाजता सावित्रीबाई फुले यांची गावातून शोभायात्रा काढून कार्यक्रम स्थळी जयंती साजरी करण्यात आली.

त्यानंतर दुपारी २.०० वाजता महिला मेळाव्याचे आयोजन व चर्चासत्र आणि त्यासोबत मुला मुलींचे व महिलांच्या विविध स्पर्धा तसेच सायं. ५.०० वा. गाव सह भोजनानंतर रात्री ८.०० वाजता महिलांचे व विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले होते.सांस्कृतिक कार्यक्रमाच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर आत्राम, तर उद्घाटक म्हणून दांडेकर सर तर प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून, भुजंगराव आत्राम, नीलकंठ जांभुळे, तिरुपती दुर्गे, मंगलदास उईके, चौधरी, गुरुकुंज महाडोळे, नितेश मेश्राम, महेश आत्राम यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आत्राम यांनी गावाचा इतिहासावर नजर टाकत यापुढेही गावाचा एकोपा असाच जात-पात-धर्म विसरून गावाच्या विकासासाठी एकत्र राहावा असे गावकऱ्यांना आव्हान केले.कार्यक्रमाचे संचालन प्रवीण राजेवर सर तर आभार सौ. खंगार मॅडम यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रभाकर मोहुर्ले, जगन जेंगठे, महेश मोहुर्ले, नागेंद्र मोहुर्ले, दिलीप मोहुर्ले, दिवाकर लेनगुरे, सुनील गुरनुले, किशोर मोहुर्ले, प्रकाश मोहुर्ले, दीपक मोहुर्ले, सचिन मेश्राम, स्वप्निल डोंगरे, दुमाजी जेंगठे, तसेच गावातील सर्व तरुण मंडळी व महिला मंडळांनी विशेष परिश्रम घेतले