बोलेरो वाहनाने एका उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने चार युवकांचा मृत्यु

29

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.५जानेवारी):-शहरातील राष्ट्रीय महामार्गावरुन रात्रीचे सुमारास भरघाव वेगाने नीघालेल्या बोलेरो वाहनाने एका उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने चार युवकांचा मृत्यु झाल्याची घटना रात्री १०.३० च्या दरम्यान घडली
सदर अपघात राष्ट्रीय महामार्गावरील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ घडला असून वाहनचालकासह या अपघातात नऊ युवकांचा समावेश असून सदर युवक मित्रपरिवार महाराष्ट्र पर्यटनासाठी निघाले होते.

नागपूर जिल्ह्यातील हिवरा हिवरी येथिल रहिवासी असलेल्या युवकांची भरधाव बोलेरो गाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवरती मागून धडकल्याने भीषण अपघात झाला.या अपघातात चौद्यांचा मृत्यू झाला.तर पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भिषण होता की बोलेरो(एमएच-४०-केआर ६४६२) समोरून चकनाचुर झाली तसेच क्षतिग्रस्त बोलेरो काढण्याकरीता क्रेनची मदत घ्यावी लागली.यात हिंगणघाट येथील ट्रक क्र.एमएच-२९-टी १००९ याचेसुद्धा मोठे नुकसान झाले.

यावेळी परिसरात उपस्थित असलेल्या युवकांनी जखमींना उपचारासाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.यातील एकाचा मृत्यु घनास्थळीच झाला तर दोन युवकांचा हिंगणघाट येथेच उपचारादरम्यान मृत्यु झाला. मृतकाची नावे वाहनचालक,शैलेश पंढरी वीरसावळे(३०),सुरज जनार्धन पाल (१९),ऋतिक हरिभाऊ कोल्हे (२०) यांचा हिंगणघाट येथेच मृत्यु झाला.तर मोहन राजेंद्र मोंढे(२०) याचा सेवाग्राम येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला.

यापैकी यश प्रमोद कोल्हे(११),शुभम प्रमोद पाल(२३) यांना प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपुर येथे पाठविन्यात आले तर प्रणय दिवाकर कोल्हे(१८),भुषण राजेंद्र खोंडे(२३),समिर अरुण मोंढे(१९)हे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.सदर प्रकरणी पोलिस ठानेदार संपत चौहान यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आगाशे हे पुढील तपास करीत आहे.