🔸भाकप चे 5 तर काँग्रेस 2 उमेदवार विजयी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.5जानेवारी):- तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा होताच निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले ,त्यात ब्रम्हपुरी तालुक्यातील बोडधा 7 सदस्य असलेली ग्रामपंचायत असून यामध्ये भाकप च्या वतीने 7 तर काँग्रेस च्या वतीने 6 उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते.

परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. विनोद झोडगे यांनी बोडधा ग्रामपंचायत अविरोध निवड करण्यासाठी पुढाकार घेतल्याने अखेर सोमवारी उमेदवारी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजता पर्यंत 6 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतल्याने बोडधा ग्रामपंचायत अविरोध निवडून आली आहे.

यामध्ये भाकप चे उमेदवार मनीषा राजेंद्र झोडगे, पपिता विकास ठाकरे, उसन गजानन ठाकरे,मंगेश धर्माजी बांबोळे,सपना वसंत लोणारे तर काँग्रेस चे दिपक मंगलदास ठाकरे,कोकिळा रामकृष्ण हुलके विजयी झाले आहेत.

अविरोध निवड करण्यासाठी राजू राऊत ,प्रशांत ठाकरे,माझी सरपंच शरद ठाकरे,दिपक ठाकरे,धनराज ठाकरे, विठल ठाकरे, रामकृष्ण हूलके, तानबा कोटगले,प्रकाश दरडमारे यांनी अथक परिश्रम घेतले.

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति

©️ALL RIGHT RESERVED