?वरोरा, चिमुर,ब्रम्हपुरी व गडचांदूर येथील नागरिकांनी लाभ घ्यावा
? दुचाकी वाहनाची नवीन मालिका सुरू
✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986
चंद्रपूर(दि.5जानेवारी):- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी व गडचांदूर या तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्क्या अनुज्ञप्ती, खाजगी संवर्गातील वाहनाची नोंदणी इत्यादी कामांकरिता माहे जानेवारी महिन्यातील एक दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
परिवहन विभागाच्या कार्यक्रमानुसार आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथे दिनांक 1 जानेवारी, शासकीय विश्रामगृह, चिमुर येथे 21 जानेवारी, एन.एच. महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे दिनांक 27 जानेवारी तर शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर येथे दिनांक 29 जानेवारी 2021 रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
दुचाकी वाहनासाठी नवी मालिका
चंद्रपुर परिवहन कार्यालयातर्फे दुचाकी वाहनासाठी एमएच -34- बीएक्स-0001 ते एमएच -34-बीएक्स-9999 ही नवीन मालिका सुरू करण्यात आली असून विशेष क्रमांकासाठी आगाऊ नोंदणी सुरू करण्यात येत आहे.
तरी इच्छुक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक जाधव यांनी केले आहे.