नेर खंडलाय हद्दीत दारू अड्ड्यावर छापा २८ हजाराचा माल नष्ट

31

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.5जानेवारी):- नेर व खंडलाय हद्दीतील खाऱ्या धरण याठिकाणी बेवारस गावठी दारू अड्ड्यावर येथील नेर दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी याठिकाणी छापा टाकला.यावेळी नेर व खंडलाय शिवारातील खाऱ्या धरणाजवळ बेवारस दारू असल्याचे माहित झाले.यावेळी ५४० लीटर गावठी दारू एकूण २८८०० रुपये किमतीची दारु गुप्त माहितीच्या आधारे सायंकाळी सुमारे पाच वाजता जागेवर नाश करण्यात आली.

धुळे येथील तालुका पोलीस निरीक्षक हेमंत पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली आज ता.४ रोजी कार्यवाही करण्यात आली.यावेळी पी.एस.आय गजानन गोटे,ए.एस.आय प्रल्हाद चव्हाण,पोलीस नाईक प्रमोद ईशी,पोलीस काॅन्स्टेबल राकेश मोरे,पोलीस मित्र छोटु कोळी आदीनी ही माहिती मिळताच त्याठिकाणी जाऊन या गावठी दारूचे बॅरेल जागेवर नाश केले.परंतु त्याठिकाणी दारू साठ्याजवळ निर्मनुष्य अवस्था सदर पोलीस कर्मचाऱ्यांना आढळून आली.याचा तपास मात्र सुरु आहे.