✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631342

बिलोली(दि.5जानेवारी):- तालुक्यातील कुंडलवाडी नगरपरिषदेचे नुतन मुख्याधिकारी म्हणून जी.एम.इरलोड यांनी दि.५ जानेवारी रोजी पदभार स्वीकारला आहे.येथील मुख्याधिकारी जी.एस.पेंटे यांची २२ डिसेंबर रोजी लोहा येथे बदली झाली होती.त्यांच्या जागी कंधार न.प.चे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांची कुंडलवाडी येथे नियुक्ती करण्यात आली होती.

पण काही तांत्रिक कारणास्तव ते येथे रूजू होऊ शकले नाहीत.त्यांनतर नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी कुंडलवाडी मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देगलूर न.प.चे मुख्याधिकारी जी.एम.इरलोड यांच्याकडे देण्याबाबत आदेश काढले होते.

त्यानंतर आज दि.५ जानेवारी रोजी जी.एम.इरलोड यांनी मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.पदभार स्वीकारताच नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. नुतन मुख्याधिकारी जी.एस.इरलोड यांनी नगरपरिषदेतील सर्व विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांची बैठक घेत कामांचा आढावा घेत कर्मचाऱ्यांना याबाबत आवश्यक त्या सुचना दिल्या.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED