पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कामकाज वेळा बदलल्या आकस्मिक प्रसंगी 24 तास सेवा उपलब्ध असणार

33

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलडाणा(दि.5जानेवारी):- पशुसंवर्धन विभागामार्फत पशुच्या वैद्यकीय सेवेकरीता जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. त्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 1 व श्रेणी 2, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालये, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालये व फिरता पशुवैद्यकीय दवाखाने यांचा समावेश आहे.

आता या सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांची सोमवार ते शुक्रवार कामकाजाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 4.30 पर्यंत, जेवनाची सुट्टी दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत राहणार आहे. तसेच शनिवार रोजी सकाळी 8 ते दु 1 वाजेपर्यंत कामकाजाची वेळ असणार आहे. पशुपालकांना आकस्मिक प्रसंगी 24 तास सेवा उपलब्ध असणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी या वेळांची नोंद घ्यावी, असे आवाहन आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी जी बोरकर यांनी केले आहे.