अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य परिवारातर्फे पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

35

प्रसार व प्रचार करणारे माध्यम व लोकशाही चा चौथा आधारस्तंभ असलेला पत्रकार /वार्ताहर समाजात कुठ अन्याय झाला असेल तर त्याला वाचा फोडण्यासाठी पत्रकार समोर येऊन बातमीच्या माध्यमातून प्रकरण उघडकीस आणन्याचे काम जर कुणी करत असेल तर तो आहे, पत्रकार, “सौ बका एक लिखा ” या उक्तीप्रमाणे जनसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज जर कुणी उठवत असेल तर तो एकमेव पत्रकार आहे.

दैनंदिन जीवनातील चालू घडामोडींवर लक्ष केंद्रित करून पत्रकार आपल्या दैनिकात प्रकाशित करून माहिती दिली जात, आज काळानुरूप पत्रकारिता पण जलद आणि अपडेट झालेली दिसून येत, पूर्वी संदेश वाहनास भरपुर वेळ लागत असे पण विज्ञानाच्या युगात जस जशी प्रगती झाली त्या सोबत पत्रकारीता मध्ये पण बदल झालेला आढळून येतो, आज युग फारच अपडेट राहत, याच बरोबर पत्रकारांना पण अपडेट राहाव लागत, व आपल्या बातम्या पण अपडेट कराव लागत.

या सर्व बाबी चा विचार केला तर यात पत्रकार महत्त्वाची भूमिका बजावत असताना आपण पाहत आहोत, अशा पत्रकारांचा पण कुठ ना कुठे गोड कौतुक करावे हे पण आपलीच जबाबदारी आहे.

या पैकी, संपादक मा, सुरेश डांगे, (साप्ताहिक पुरोगामी संदेश) संपादक विठ्ठल आवळे (साप्ताहिक सप्तरंग साहित्यिक) , पत्रकार शरद गोभे, पत्रकार, सुरेश कड यांचा विशेष उल्लेख करावा लागणार आहे, यांनी आपल्या पत्रकारीता करीता उचित न्याय दिला, योग्य त्या बातम्या संकलीत करून त्यांना प्रसिद्ध करण्याचे काम केले आहे, अशा पत्रकारांना पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे.

✒️गजानन गोपेवाड,
राज्य समन्वयक महाराष्ट्र