जिल्हा परिषदेमध्ये रक्तदान व रोगनिदान शिबीर संपन्न

27

🔸मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचेसह जिल्हा परिषदेतील 51 कर्मचाऱ्यांचे रक्तदान

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.5जानेवारी):- रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान ! रक्तदानाची भावना कर्मचाऱ्यांमध् वाढीस लागावी तसेच अधिकारी कर्मचारी यांचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी राहुल कर्डिले यांनी आज स्वत: तसेच जिल्हा परिषदेतील 51 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
जिल्हा परिषदेच्या कन्नमवार सभागृह येथे अधिकारी व कर्मचारी वर्गाकरीता रक्तदान व रोगनिदान शिबीराचे तसेच ॲनिमियामुक्त भारत अभियान AMB कॉर्नर चे उद्घघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी कर्डिले यांचे हस्ते पार पडले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन सामान्य प्रशासन विभाग व आरोग्य विभाग जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले. सदर शिबीराकरीता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम वाखर्डे यांचे विशेष मार्गदर्शन यावेळी लाभले.यावेळी कोरोना आजार होऊन गेलेल्या तीन अधिकाऱ्यांनी प्लाज्मा दान केले.

तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय पचारे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन राऊत यांचे प्लाज्मा दान करीता नमुने घेण्यात आले. सदर रोगनिदान शिबीरात 177 अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबीराकरीता जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सोमनाथे, शिक्षणाधिकारी प्राथमिक दिपेंद्र लोखंडे, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे, डॉ. किर्ती साने व त्यांची चमू, वैद्यकीय अधिकारी डॉ. मिना मडावी यांची उपस्थिती होती.

सदर शिबीरप्रसंगी रक्तदान तपासणी, सिकलसेल व असांसर्गीक आजार तपासणी करण्यात आली तसेच ॲनिमियामुक्त भारत कार्यक्रमाअंतर्गत महिलांना हिमोग्लेाबीन वाढीकरीता गोळया वाटप करण्यात आल्या.कार्यक्रमाचे यशस्वातेकरीता आरोग्य विभागातील शालीक माहुलीकर, सुभाष सोरते व सामान्य प्रशासन विभागातील आनंद सातपुते, नितीन फुलझले यांनी परिश्रम घेतले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी कळविले आहे.