🔸गुरुजी फाउंडेशन व कमल फाऊंडेशनचा उपक्रम

✒️माधव शिंदे(नांदेड, जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.6जानेवारी:-समाजातील दुर्लक्षित आणि उपेक्षित जीवन जगणाऱ्या व्यक्तींना मायेची ऊब देत नांदेड येथील सामाजिक संस्था गुरुजी फाऊंडेशन व कमल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार उदय नरवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय, रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात गरजू व्यक्तींना दिव्यांगांच्या हस्ते मोफत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

आज प्रत्येकाचा खर्च वाढला असुन, अनेकजण अनावश्यक गोष्टीवर अधिक खर्च करताना दिसून येतात. लग्न, वाढदिवस, नामकरण आशा कार्यक्रमात सर्रासपणे आनाश्यक पैशांची उधळपट्टी केली जाते. मात्र आजही समाजात वावरताना आजही काही व्यक्ती समाज उपयोगी उपक्रम राबविताना दिसून येतात. ज्या समाजाने आपल्याला घडवले त्या समाजासाठी अपणालाही काही देणे आहे, या भावनेतून पत्रकार उदय नरवाडे यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून, नांदेड येथील सामाजिक संस्था गुरुजी फाउंडेशन व कमल फाऊंडेशन या संस्थेमार्फत दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते नांदेड येथील शासकीय रुग्णालय, रेल्वे स्टेशन, बसस्थानक आदी परिसरात फुटपाथवर झोपलेल्या उपेक्षित व गरजू व्यक्तींना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेटचे वाटप केले.

नरवाडे यांनी आनावश्यक खर्च टाळून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी गुरुजी फाउंडेशनचे यशपाल भोसले, पत्रकार उदय नरवाडे, पत्रकार अविनाश पाईकराव, कमल फाऊंडेशनचे राहुल साळवे, अमरदीप गोधने, आर्यन श्रीमंगले, घनश्याम जाधव, राजु ईराबत्तीन, कार्तिक भरतीपुरम आदींची उपस्थिती होती.

नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED