ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा

25

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.6 जानेवारी):- जिद्द चिकाटी व न घाबरता सत्य परिस्थिती विषयी लेखन करण्याचे काम पत्रकार करतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजतगायत पत्रकारांनी देशाच्या हितासाठी आपली लेखणी वापरली व देशहितासाठी झटले, म्हणून राष्ट्र निर्मितीसाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन ब्रम्हपुरी पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार प्रा. विजय मुडे याप्रसंगी केले.ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन अर्धसाप्ताहीक ब्रम्हपुरी समाचार कार्यालयाच्या सभागृहात आज दि. 6 जानेवारी ला आयोजित करण्यात आला.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष म्हणून प्रा. विजय मुडे , उपाध्यक्ष म्हणून ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय रामटेके , सचिव दीपक पत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.

यावेळी पत्रकार ज्येष्ठ पत्रकार दिलीप शिनखेडे, जीवन बागडे , प्रा. श्याम करंबे, नुरुल अन्सारी, यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्याविषयी टाकला तसेच वृत्त्तपत्र व पत्रकार यांच्यासमोरील आव्हान व समस्या विषयी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण मेश्राम प्रास्ताविक पत्रकार गोवर्धन दोनाडकर तर आभार महेश पिल्लारे यांनी मानले.सदर कार्यक्रमाला दिवाकर मंडपे, नेताजी मेश्राम, अमर गाडगे, प्रा. चंद्रशेखर गणवीर, उपस्थित होते.