चिमुर तालुका प्रेस असोसिएशनच्या वतीने दर्पनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती

30

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.6जानेवारी):- तालुका प्रेस असोसियशन चिमुरच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जाम्भेकर यांची जयंती पत्रकार दिना निमित्ताने उत्साहात साजरी करण्यात आली.

दिनांक 6 जानेवारी रोजी नियोजित पत्रकार भवन येथे चिमुर तालुका प्रेस असोसियशन चिमुर तालुका अध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितित पंकज मिश्रा यांचे हस्ते दिप प्रज्वलित करुन दर्पनकार आचार्य बाळशास्त्री जाम्भेकर यांचे प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

त्यानंतर प्रेस अस्सोसियशनचे अध्यक्ष यानी बाळशास्त्री जाम्भेकर याणा अभिवादन करुन त्याच्या कार्यवार प्रकाश टाकला, त्यानंतर मिठाई वाटून कार्यकर्माची सांगता करण्यात आली.या वेळी प्रेस असोसियशनचे अध्यक्ष चुन्नीलाल कुड़वे, श्रीहरी सातपुते, इमरान कुरेशी, पंकज मिश्रा, जितेंद्र सहारे, मनोज डोंगरे, रामदास ठुसे, संजय नागदेवते, योगेश सहारे, जितेंद्र गाडगे, प्रकाश पाटिल, उमेश शाम्भरकर, आदि पत्रकार उपस्तित होते