विदेशी पर्यटकावर तात्काळ बंदी घाला- वन्यप्रेमी कवडू लोहकरे यांची मागणी

46

🔹ताडोबा प्रशासनाला महसुलाची चिंता मग सामान्य जनतेचं काय?

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.6डिसेंबर):-जगात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प “वाघाची पंढरी” म्हणून प्रसिद्ध आहे. देश – विदेशातील पर्यटक वाघाची झलक पाहण्यासाठी ताडोबाला मुक्कामी येत असतात. सेलीब्रिटी, स्टार , उद्योजक, खेळाडू आदी वाघ बघण्यासाठी येत असतात.जगात कोरोनाने थैमान घातल्याने संपुर्ण देश होरपळून निघाला. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या कोरोनामुळे देशाच्या अर्थ व्यवस्थेला जबर हादरा बसला.

सध्या कोरोनाचे संकट जरी कमी होत असले तरी नुकतेच ब्रिटिश वरुन नागपूरला आलेला व्यक्ति नविन संक्रमित पाँझिटिव्ह आढळून आल्याने नविन कोरोनाचा धोका वाढला आहे.सध्या विदेशात कोरोनाचा कहर वाढल्याने जगभरात खळबळ उडाली आहे.सध्या कोलारा, मदनापुर, अलिझंझा नवेगाव या गेटवरुन विदेशी पर्यटकांची तुंबळ बघायला मिळत अाहे.

या विदेशी पर्यटकांमुळे नविन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास कोण जबाबदार राहणार?
ताडोबा प्रशासन महसुल वाढीवर भर देत आहे पण सामान्य जनतेचं काय? अशा परिस्थितीत ताडोबा प्रशासनाने विदेशी पर्यटकावर वर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी कवडू लोहकरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.