महात्मा फुले व सावित्रीबाई फुले दाम्पत्यास मरणोत्तर भारतरत्न द्या किसान समाज पार्टीची मागणी

27

✒️ संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.7जानेवारी):-अतुल भाऊ भुसारी पाटील.. युवा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य किसान समाज पार्टी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे मागणी करावी महिला शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्राकडे शिफारस करावी

अशी मागणी किसान समाज पार्टीचे चे युवा प्रदेशाध्यक्ष अतुल भाऊ भुसारी पाटील यांनी.. अतुलभाऊ भुसारी पाटील म्हणाले की महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या मुळे आज महिला व मुली अनेक क्षेञामध्ये पुरुषांच्या बरोबरीने यशप्राप्ती केली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले मुळे अनेक मुली शिक्षीका ईजीनीयर पायलट वैद्यकीय अधिकारी वैज्ञानिक सैनिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपले योगदान देत आहेत साविञीबाई यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलाना शिक्षीत करण्यात आणि त्यांना त्यांची हक्क मिळवून देण्यासाठी खर्ची आहे या दाम्पत्यास मरणोत्तर भारतरत्न दावा अशी मागणी केली.