समानतेचा ध्यास

28

कितीही मंदिरे बांधा तरी
माणसातील सत्य दिसणार नाही.
कितीही घंटा वाजवल्या तरी
दगडाची मुर्ती काही पावत नाही.

कितीही शिक्षण घेतले तरी
नवज्ञानाचा ध्यास लागत नाही.
मनात बसलेल्या कुविचाराचा
कधीच अंत होत नाही.

मंदिर व ईश्वर तर
पुजाऱ्याचा पोटापाण्याचा धंदा आहे.
बहुजनाच्या गुलामीचा तर
हाच मोठा कुटीलडाव आहे.

मंदिर हवं की शिक्षण
यांचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे.
बहुजनानो तुमच्या गुलामीच
जोखंड तोडून फेकलं पाहिजे.

बहुजनानो जागे व्हा रे,
डोंगरलाटा उधळून द्या रे.
संविधान जाणून घ्या रे,
पिढ्या आपल्या वाचवा रे.

समानतेचा ध्यास धरा रे,
अज्ञानाला दूर सारा रे.
खोट्यांना खेटर द्या रे,
धर्मवाद्यांपासून देश वाचवा रे.

✒️संदीप गायकवाड,नागपूर
९६३७३५७४००