ओम शांती परिवार अंबाजोगाई कडून कार्यालयीन अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले ए एस शेख यांचा सत्कार

    36

    ✒️अंबेजोगाई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    अंबेजोगाई(दि.8जानेवारी):- स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालाय रुग्णालय, अंबाजोगाई येथून प्रयोगशाळा परिचर म्हणून आपल्या शासकीय कार्याची सुरवात करत वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवत, प्रयोगशाळा परिचर, कनिष्ठ लिपिक, कार्यालयीन अधीक्षक ते वरिष्ठ साहाय्यक म्हणून ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , चंद्रपूर येथून नुकतेच सेवानिवृत्त होणारे मा. ए. एस. शेख यांचा सत्कार ओम शांती परिवार अंबेजोगाई यांच्याकडून करण्यात आला.

    त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कार्याची दखल घेत त्यांच्या कार्यकाळात अनेक वेळा त्यांचे सत्कार कऱण्यात आले. लातूर येथे कार्यरत असतांना तत्कालीन मा. मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सुद्धा उल्लेखनीय प्रशासकीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला होता. परंतु बाहेरच्या लोकांपेक्षा घरच्यांनी दिलेला सन्मान खूप महत्त्वाचा असतो असे ए एस शेख यांनी अंबेजोगाई ओम शांती परिवारातर्फे सत्कार स्वीकारताना सांगितले.