नेर परीसरात ‘अवकाळी’ पावसाचा तडाखा

37

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.8जानेवारी):- नेर परिसरात ऐन थंडीच्या मोसमात काल दि.०७-०१-२०२१ सायंकाळी अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. धुळे तालुक्यातील नेर व परिसरातील गावांमध्ये जोरदार पाऊस पडला. त्यातील कांदा पिकांचे बरेच प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे तासभर झालेला पावसामुळे नागरिकांनी पावसाळी वातावरणाचा अनुभव घेतला. नेर परिसरातील खंडलाय, शिरदाने, देऊर, लोणखेडी. नांद्रे,उभंड सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. नेर परिसरात पावसाचा जोर अधिक होता. तासभर झालेला पावसाने परिसरात ओलाचिंब झाला पाऊस आला तरी वाऱ्याचा जोर जास्त कमी असल्याने ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे.

दुपारनंतर आकाशात पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. यामुळे पाऊस येईल असा अंदाज झाला होता. अखेर पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली होती. तसेच नेर परिसरात जोराचा पाऊस झाला आहे.ऐन थंडीच्या दिवसात नागरिकांना पावसाचा सामना करावा लागला. नेर येथे गुरुवारचा बाजार असतो बाजारपेठेत भाजीपाला विक्रेत्यांची पावसामुळे धावपळ झाली. रात्री नऊ वाजेच्या सुमारास पावसाने पुन्हा जोर धरला परिसरात कांदा लागवड झाली असून शेतकरी वर्गा कडून नुकसानीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.