दोंडाईचा शहर भाजपातर्फे आ.जयकुमार रावल यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे विमोचन

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.८जानेवारी):- दोंडाईचा नगरपलीकेच्या माध्यमातून २०१६ पासुन मा.आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली ताईसाहेब नयनकुवँर रावल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सर्व नगरसेवक, पदाधिकारी यांच्या पाठपुराव्यामुळे दोंडाईचा शहरातील विविध विकासकामांचे नियोजन करुन पुर्णत्वाकडे आहेत अशा सर्व कामांची माहिती भाजपातर्फे दिनदर्शिकेचे विमोचन मा.आमदार जयकुमार रावल यांनी केले .जयकुमार रावल यांनी बोलतांना सांगितले की भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून पक्षाचे दिनदर्शीका स्वखर्चाने प्रकाशीत करुन शहरातील कोट्यावधी कामांची जंत्रीच सादर केली आहे.

सदर स्तुत्य उपक्रम असुन शहरातील जनतेला उपयुक्त रेल्वे वेळापत्रक व शासकीय कामांसाठी लागणारे कागदपत्रे इ उपयुक्त माहिती दिली आहे त्याचे स्वागत करावे असे सांगितले.याप्रसंगी उपस्थित भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन , बांधकाम सभापती निखिल जाधव, आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे ,नगरसेवक कृष्णा नगराळे, नरेंद्र गिरासे,युवा मोर्चा अध्यक्ष राजु बाबा धनगर,दिलीप जाधव , नरेंद्र ठाकुर,ईश्र्वर धनगर , सुनिल धनगर, डॉ मुकुंद सोहनी, डॉ अनिल सोहनी,चेतन सिसोदिया ,मनोहर कापुरे इ मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED