तोरणा ग्रामपंचायतीमधील दोन प्रभागमधील चार जागा बिनविरोध

27

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.8जानेवारी):- तालुक्यातील तोरणा ग्रामपंचायत मधील दोन प्रभागातील चार जागी एकमेव नामनिर्देशन पत्रे आल्यामुळे ते बिनविरोध निघाले आहेत.तालुक्यातील तोरणा या ७ सदस्यीय ग्रामपंचायतीमधील प्रभाग क्र.१ मधील सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या जागेसाठी रेखा सखाराम नरवाडे व प्रभाग क्र.१ मधुनच ललिताबाई बालाजी हिवराळे तसेच प्रभाग क्र.२ मधुन आनंद विलास नरवाडे व गिताबाई गणपती बोरगावे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्रे आल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत.सर्व बिनविरोध निवडुन आलेले उमेदवार ग्रामविकास पँनलचे आहेत.

तसेच इतर मागासवर्गीय जागेसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातुन एकही नामनिर्देशन पत्रे न आल्याने ते सध्या रिक्त असुन आता तोरणा ग्रामपंचायतीत अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी १५ जानेवारी रोजी निवडणूक होणार असुन यासाठी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
ग्रामपंचायतीतील सदस्य बिनविरोध निवडण्यासाठी ग्रामविकास पँनल प्रमुख तथा तंटामुक्ती अध्यक्ष रावसाहेब पाटील नरवाडे,गोविंद गुरूजी हिवराळे,मारोतराव गुरूजी,गंगाराम पाटील हिवराळे,गणपती माली पाटील नरवाडे,गणेश नरवाडे,सुरेश हिवराळे,पांडुरंग हिवराळे,बाबु नरवाडे,माधव नरवाडे,शिवाजी नरवाडे,मारोती पाटील पहेलवान आदींनी प्रयत्न केले.