प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिका-यांनी तब्बल १२ कि.मी. पायपीट करून विद्यार्थ्यांना केली शैक्षणिक मदत

62

🔸शेकडो वर्षापासून आम्ही पत्रकार पाहिलो नव्हतो, गावक-यांची वेदना

✒️रायगड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

रायगड(दि.9जानेवारी):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ खालापूर तालुक्याच्या पदाधिका-यांनी तब्बल १२ किलोमीटर पायपीट करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप केले आहे. हे सर्व पाहून करंबेली ठाकुरवाडी गावकरी भारावून गेले आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून आमच्या गावात एकही पत्रकार आले नाहीत. सहा पिढ्यानंतर पहिला पत्रकार आमच्या गावांनी पाहिला तो प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचाच अशी आर्त भावना गावक-यांनी व्यक्त केली. संघाच्या वतीने छत्तीशी विभागातील करंबेली ठाकुरवाडी, आदिवासीवाडी, भीमनगर वावोशी, वावोशी फाटा येथे मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करून मक्स वेअर कंपनीचे मॅनेजर सुनील शेवाळे यांना कोरोना योध्या पुरस्कार देऊन सन्मानित आलेअशा प्रकारे अनेक उपक्रम करून पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर शाखेचे अध्यक्ष संतोष शेवाळे, सचिव जतिन मोरे, सहसचिव गणेश मोरे, खजिनदार राजू भंडारी, योगेश कदम यांनी करंबेली ठाकुरवाडी, आदिवासीवाडी अशा अतिदुर्गम ठिकाणी जाऊन तेथील समाजमंदिरात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि पत्रकार दिनाचे महत्त्व विशद करतांना संविधान आणि पत्रकारिता यांचा परस्परसंबंध उपस्थितांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी करंबेली ठाकूरवाडी रायगड जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक संतोष बोडेकर, माजी सरपंच माडे, ग्रामस्थ, महिला व तरुण वर्ग उपस्थित होते.