ग्रामविकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू-आ.डॉ.रत्नाकर गुट्टे पालम तालुक्यातल्या नवनियुक्त ग्रा.पं.सदस्यांचा सत्कार

30

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.9जानेवारी):- पालम तालुक्यातील आठ गावातील ग्रामस्थ्लृांनी ग्रामपंचायत नि वडणुका टाळून बिनविरोध प्रक्रिया पार पाडल्या बद्दल हे गावकरी अभिनंदनास पात्र आहेत. या निमित्ताने गावात एकोपा निर्माण झाला असून ग्रामविकासासाठी मार्ग सुकर झाला असल्याचे प्रतिपादन आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले. पालम तालुक्यातील बिनविरोध निवडणुका झालेल्या ग्रा.पं.सदस्यांचा आज (दि.9) आ.डॉ.गुट्टे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया सुरू असून गंगाखेड विधानसभा मतदार संघातही निवडणुका होत आहेत. या निवडणुकांवर होणारा खर्च टाळण्यासाठी आणि निवडणुक निमित्ताने गावागावात होणारे वाद मिटविण्यासाठी त्याचबरोबर गावाच्या सर्वांगिण विकासासाठी निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन आ.डॉ.गुट्टे यांनी केले होते.

त्यांच्या आवाहानाला प्रतिसाद देत पालम तालुक्यातील खडी, खुरलेवाडी, गुंज, दुटका, शिरपुर, तेलजापुर ,भालकुडकी,ऊकडगाव या गावच्या ग्रामस्थानी निवडणुका टाळून बिनविरोध प्रक्रिया पार पाडली आहे. बिनविरोध निवडुण आलेल्या सदस्यांनी व गावकर्‍यांनी गावात शांतता राहण्यासाठी मोठे कार्य केले असून आता या पुढे गावविकासासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. मतदार संघाचा आमदार म्हणून मी या सर्वगावकर्‍यांच्या सोबत असून विकासासाठी निधी पडू दिला जाणार नाही असेही आ.गुट्टे यांनी सांगितले.

यावेळी खडी,दुटका,सिरपुर, तेलजापुर, गुंज,खुर्लेवाडी,भालकुडकी, ग्रामपंचायत च्या नवनिर्वाचित सदस्यांचा आ.डॉ. रत्नाकरराव गुट्टे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या प्रसंगी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या सह रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप अळणुरे, पालम,पुर्णा तालुका प्रभारी माधवराव गायकवाड, तालुका अध्यक्ष नारायण दुधाटे,विशाल दादेवाड, शामराव काळे ,तायरखाँ पठाण, पिरखाँ पठाण आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थ्लिृत होते.