भंडारा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीची केंद्रीय पथकाकडून चौकशी करा – वैभव गिते

  39

  ?राज्यशासनाने प्रत्येक कुटुंबास 25 लाख रुपये मदत करावी

  ✒️संजय कांबळे माकेगावकर(अहमदपूर,प्रतिनिधी जिल्हा)मो:-9860208144

  अहमदपूर(दि.9जानेवारी):-जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात शिशु मृत्युमुखी पडली आहेत.ही घटना हृदयाला पीळ घालणारी असून याची केंद्रीय पथकाकडून चौकशी झाली पाहिजे.केंद्रीय पथकाने केरळ किंवा कर्नाटक राज्यातील अधिकाऱ्यांकरवी तपास करावा.राज्यशासनाने प्रत्येक कुटुंबास 25 लाखाची तातडीची मदत द्यावी.फक्त फायर ऑडिट न करता महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांमध्ये गरीब व गरजू रुग्णांना उपचार व्यवस्थित मिळतात का?महात्मा फुले जण आरोग्य योजनेची अंमलबजावणी होते किंवा नाही महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयांमध्ये मिळणारे उपचार मोफत व योग्य प्रकारे मिळतात का? रुग्णांकडून पैशाची लूट होते का? याचे सुद्धा संपूर्ण ऑडिट झाले पाहिजे.

  तसेच धर्मादाय अंतर्गत नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये दहा टक्के खाटा राखीव असतात परंतु या दहा टक्के राखीव खाटांवर गोरगरिबांना मोफत उपचार मिळतात का? प्रत्येक जिल्ह्याचे शल्यचिकित्सक या योजनांच्या अंमलबजावणीचे अध्यक्ष असतात ते नियमितपणे बैठका घेतात का? हे सर्व प्रश्न भंडारा जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयाच्या इमारतीस लागलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या निमित्ताने ऐरणीवर आले आहेत.त्यामुळे सरकारने फक्त फायर ऑडिट करून वरवरची मलमपट्टी करू नये व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पाच लाख रुपयांची घोषणा करून हात वर करू नये मार्च 2013 रोजी मंत्रालयाला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झालेल्या बारामतीच्या कुटुंबास 15 लाख रुपये मदत त्यावेळी दिली होती मग भंडारा दुर्घटनेत फक्त पाच लाखाची तुटपुंज्या मदतीची घोषणा करता हा भेदभाव का करता?असा सवाल राज्यशासनास लोकप्रिय नेते वैभवजी गिते यांनी केला आहे.
  सत्ताधार्यांनी,विरोधी पक्षांनी व संघटनांनी या दुर्घटनेचे राजकारण न करता या विषई माणुसकीच्या दृष्टकोणातून पाहिले पाहिजे इच्छाशक्तीचा वापर करून गंजलेली व बुरसटलेली तसेच भ्रष्टाचाराने बरबटलेली आरोग्य व्यवस्था सामान्य गोरगरिबांसाठी सुरळीत करावी असे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते,राज्य समनवयक रमाताई आहिरे,सहसचिव पी.एस.खंदारे,राज्य कोषाध्यक्ष शिवराम कांबळे,महिला संघटक पंचशीला कुंभारकर,राज्य उपाध्यक्ष शरद शेळके,राज्य निरीक्षक बी.पी.लांडगे, मराठवाडा उपाध्यक्ष संजय माकेगावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.