तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सौ.निता सुभाष दरबस्तेवार (दमकोंडवार) सर्वप्रथम

29

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.9जानेवारी):-21 व्या शतकातील विद्यादायिनी ,एक युगंधरा, शिक्षणाची गंगोत्री, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून बिलोली पंचायत समिती शिक्षण विभाग गटसाधन केंद्रातर्फे गटशिक्षणाधिकारी श्री .तोटरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच दि.8 जानेवारी 2021 रोजी महिला शिक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले होते .या दिनानिमित्त बिलोली तालुक्यातील सर्व महिला शिक्षिका साठी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि एकांकी स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

या तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कुंडलवाडी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली येथील सहशिक्षिका सौ .नीता सुभाष दरबस्तेवार/दमकोंडवार ( सर्वप्रथम ),तर सौ. एस. डी. देशपांडे( द्वितीय), श्रीमती अश्विनी कोत्तावाड (तृतीय )आलेल्या आहेत.तर एकांकी स्पर्धेत श्रीमती के.टी. मुळावकर( प्रथम) ,सौ .शोभा तोटावार (द्वितीय ),सौ.शिवकन्या पटवे (तृतीय) आलेल्या आहेत.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटसाधन केंद्राचे शिक्षण विस्तार अधिकारी सौ. भैरवाड मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी वाय. एस.कौठकर, विषय तज्ञ राठोड सर ,हलगरे सर आदी मान्यवर उपस्थित होते .या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सहशिक्षक साईनाथ राचेवाड,वाघमारे सर यांनी काम पाहिले .तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शोभा तोटावार ,सौ.शिवकन्या पटवे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार विषय तज्ञ हलगरे सर यांनी मानले.याप्रसंगी बिलोली तालुक्यातील सर्व महिला शिक्षिका बहुसंख्येने उपस्थित होते.