घुंगराळा नगरीच्या विकासात आणखी एक मानाचा तुरा

28

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.9जानेवारी):-राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस श्री वसंत सुगावे पाटील व कुंटुर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण साहेब यांच्या हस्ते घुंगराळा येथे वक्रांगी एटीएम केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले
घुंगराळा गावात सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत .त्यात फक्त एका गोष्टीची कमी होती ते म्हणजे एटीएम केंद्राची, ही बाब रा.यु.काँ.चे प्रदेश सरचिटणीस श्री वसंत सुगावे पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी घुंगराळा नगरीतील व आसपासच्या नागरिकांना एटीएम उपलब्ध करुन देण्यासाठी वक्रांगी कंपनी च्या व्यवस्थापकांशी चर्चा केली..

कंपनी च्या व्यवस्थापकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला..त्यात देगावचे दिगंबर आनंदराव पाटील मोरे यांनी सुगावे साहेबांच्या विनंतीला मान देवून आम्ही घुंगराळा या ठिकाणीच एटीएम उभारू असे आश्वासन दिले, व त्या आश्वासनाची पूर्ती केली. अखेर वसंत सुगावे पाटील यांना घुंगराळा नगरीत एटीएम उभारणी साठी यश आले असून याचा लाभ घुंगराळा तसेच आजुबाजुच्या गावातील नागरिकांना होईल.

उद्घाटनाच्या प्रसंगी डॉ.दत्ता पा. मोरे, रावसाहेब पा. मोरे, मा. चेअरमन सुभाष पा.मोरे, चेअरमन बळवंत पा. मोरे मा. सरपंच उत्तम पा.मोरे, तसेच गावातील विस्तार अधिकारी श्री मातावाड साहेब, से. नि.विस्तार अधिकारी श्री दंडेवाड साहेब, श्री चंद्रप्रकाश पा.ढगे, श्री शिवाजी पा.ढगे श्री किशन पा. सुगावे, श्री गंगाधर पा.ढगे , श्री एस.के. गजभारे साहेब, श्री संजय जी गजभारे,श्री गंगाराम जी सूर्यवंशी, श्री बालाजी हाळदेवाड, श्री भाऊराव पा.ढगे, श्री श्याम यमलवाड, श्री माधव जलदेवार तसेच देगाव व घुंगराळा नगरीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती..