बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात संबंध भारतात EVM बंदी पर्यंत चक्काजाम व्हावा – डेमोक्रॅटिक रिपाई

  36

  ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  मुंबई(दि.10जानेवारी):- देशात हुकूमशाही आपले वर्चस्व गाजवीत असून लोकशाही धोक्यात आली आहे याला मूळ कारण EVM आहे त्यामुळे संबंध भारतात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात EVM बंद होईपर्यंत चक्क जाम आंदोलन उभारण्यात यावे असे मत डेमोक्रॅटिक रिपाइंचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले आहे.

  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व गटांनी एकत्र यावे व सत्तांतरण करण्यासाठी नेतृत्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी करावे असेही परखड मत डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केले.

  डॉ. माकणीकर पुढे म्हणाले की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे असंख्य गट झाले असून आंबेडकरी विचारांचा समाज आज गटा तटात विखुरला आहे.
  यामुळे सत्येपासून दूर तर झालाच आहे पण स्वाभिमान व आत्म विश्वास गमावून बसला आहे.

  सर्व गटांचे ध्येय, ध्येय आणि उद्दिस्थे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न प्रामाणिकपणे साकार करणे हेच होय, असे असतानाही सर्वांनी स्वतःच्या वेगळ्या चूली मांडन्याचर कारण काय?

  मनुवादी शक्ती डोकं वर काढून दिन दुबळ्या शेतकरी कष्टकरी नवतरुण यांच्या छाताडावर बसून कचाकचा घाव घालून जगण्याची नैतिक मूल्य संपवत आहे, राष्ट्रीय करना पेक्षा खाजगिकरना ला महत्व दिले जात आहे. भारतीय संविधान संपवन्यात येत आहे, लोकशाहीचा घोट घेतला जात आहे. आणि विरोधी पक्ष निकामी झालेला दिसत आहे.

  लोकशाही मजबुती कारणासाठी भारतीय संविधान टिकवून संविधानातील तत्वांची अंमलबजावणी होणे फार अगत्याचे आहे. मनुवादी विचारांनी राज्यासह देशात थैमान माजविले असून भारतीय एकात्मता व अखंडतेला बाधित आहे, या विचारांच्या लढाई मध्ये घातपात खून-खराबा केला जात आहे. महिला मागासवर्गीय व आदिवासी आणि मुस्लिम भयभीत झाला आहे.

  यामुळे RPI च्या सर्व गटा नि एकत्र येऊन वेगवेगळ्या पक्षांना सोबत घ्यावे व EVM बंद होत नाही तोपर्यंत संबंध भारताने चक्क जाम करावे. व याचे नेतृत्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी करावे अशीही प्रतिक्रिया डॉ माकणीकर यांनी दिली.